स्तोत्रसंहिता 50
50
देव न्यायाधीश आहे
आसाफाचे स्तोत्र.
1देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.
2सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे.
3आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.
4त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो :
5“ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.”
6आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते; देव स्वतः न्याय करणारा आहे.
(सेला)
7“माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे; हे इस्राएला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो : मी देव, तुझा देव आहे;
8तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही; तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.
9तुझ्या घरचा गोर्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही.
10कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत.
11डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत.
12मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे.
13बैलांचे मांस मी खाणार काय? बोकडांचे रक्त मी पिणार काय?
14देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड;
15आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“
16दुर्जनाला तर देव म्हणतो : “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण?
17तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.
18तू चोर पाहिलास की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो; तू व्यभिचारी माणसांचा साथीदार आहेस.
19तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडले आहेस, तुझी जीभ कपटाची योजना करते.
20तू आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस; तू आपल्या सख्ख्या भावाची चहाडी करतोस.
21असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.
22अहो देवाला विसरणार्यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.
23जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 50: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: