स्तोत्रसंहिता 97
97
देवाचे राज्य व सामर्थ्य
1परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो!
2ढग व अंधार त्याच्याभोवती आहेत; नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.
3त्याच्यापुढे अग्नी चालतो, आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो.
4त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली.
5परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले.
6आकाशाने त्याची नीती प्रकट केली; सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.
7जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,2 त्याच्या चरणी लागा.
8हे ऐकून सीयोन हर्षित झाली; हे परमेश्वरा, तुझ्या न्यायकृत्यांमुळे यहूदाच्या कन्यांनी उल्लास केला.
9कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस. सर्व देवांहून तू परमथोर आहेस.
10अहो परमेश्वरावर प्रीती करणार्यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.
11नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
12अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा; त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 97: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: