प्रकटी 16
16
1नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’
2तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’
3दुसर्याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा ‘समुद्र’ मृत माणसाच्या रक्तासारखा ‘रक्तमय झाला’ आणि ‘त्यातील’ सर्व प्राणी ‘मरून गेले.’
4तिसर्याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’
5तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले,
“हे प्रभू,
‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’,
त्या तू असा न्यायनिवाडा केलास
म्हणून तू ‘न्यायी’ आहेस;
6कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’
आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे;
ह्यास ते पात्र आहेत.”
7नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले,
“हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था,
‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”
8चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली.
9माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
10पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या;
11आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप केला नाही.
12सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’
13नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले.
14ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.
15(“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”)
16त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.
17सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”
18तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’
19मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.
20प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही.
21सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.
सध्या निवडलेले:
प्रकटी 16: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

:
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)