रोमकरांस पत्र 16
16
पौलाचा मित्रमंडळीला सलाम
1किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो;
2अशासाठी की, तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय्य करावे; कारण ती स्वत: पुष्कळ जणांस व मलाही साहाय्य करणारी अशी झाली आहे.
3ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना सलाम सांगा;
4त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला.1 त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात.
5जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा; माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे.
6मरीयेला सलाम सांगा; तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत.
7माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते.
8प्रभूमध्ये माझा प्रिय आंप्लियात ह्याला सलाम सांगा.
9ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना सलाम सांगा.
10ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरातील माणसांना सलाम सांगा.
11माझा नातेवाईक हेरोदियोन ह्याला सलाम सांगा. नार्किससच्या घरातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा.
12प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफासा ह्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले.
13प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा.
14असुंक्रित, फ्लगोन, हर्मास, पत्रबास, हर्मेस ह्यांना व त्यांच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा.
15फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा.
16पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
फुटी पाडणार्यांसंबंधी इशारा
17आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.
18कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.
19तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.
20शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.
निरनिराळ्या जणांचा सलाम
21माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.
22हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो.
23माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.
24[आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.]
ईशस्तवन
25-27आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.
सध्या निवडलेले:
रोमकरांस पत्र 16: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: