गीतरत्न 6
6
1स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझा वल्लभ कोठे गेला? तुझा वल्लभ कोणीकडे निघून गेला ते सांग, म्हणजे त्याला शोधायला आम्ही तुझ्याबरोबर येऊ.
2माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.
3मी आपल्या वल्लभाची आहे, व माझा वल्लभ माझा आहे; तो आपला कळप भुईकमळांमध्ये चारतो.
वराकडून वधूची प्रशंसा
4माझ्या सखे, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहेस; ध्वजा फडकवणार्या सेनेसारखी तू हैराण करणारी आहेस.
5तू माझ्यावरून आपले डोळे काढ; त्यांनी मला घाबरे केले आहे; तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.
6धुतलेल्या मेंढ्या जोडीजोडीने येतात, त्यांतल्या कोणाचीही जोडी फुटत नसते, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
7तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात.
8साठ राण्या, ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी आहेत;
9पण माझी कपोती, माझी विमला अशी एकच; ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे; तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले, राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली.
10“ही प्रभातेसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, ध्वजा फडकवणार्या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणारी अशी ही दर्शन देत आहे, ती कोण?”
11खोर्यांतील हिरवीगार झाडेझुडपे पाहावी, द्राक्षलता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते.
12माझ्या राजवंशी लोकांच्या रथात माझ्या मनाने मला उचलून बसवले, ह्याचे मला भानच राहिले नाही.
13मागे फीर, मागे फीर, अगे शुलेमकरिणी; मागे फीर, मागे फीर, म्हणजे आम्ही तुला डोळे भरून पाहू. शुलेमकरिणीचे तुम्ही काय पाहू इच्छिता? महनाईम येथील नृत्यासारखे नृत्य काय?
सध्या निवडलेले:
गीतरत्न 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: