YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 7

7
1हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत.
2तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे; त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही, तुझे उदर सभोवती भुईकमळे लावलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे.
4तुझा कंठ हस्तदंती मनोर्‍यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे.
5तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे.
वधूवरांचा आनंद
6हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस!
7तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे; तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत.
8मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा.
9तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो.
10मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
11माझ्या वल्लभा, ऊठ, आपण गांवढ्यात जाऊ; खेड्यात रात्र घालवू.
12आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन.
13पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे; आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्याजुन्या बारांची उत्तम फळे आहेत; हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.

सध्या निवडलेले:

गीतरत्न 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन