तीत 1
1
सलाम
1विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला :
2जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणार्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
3त्या जीवनाची आशा बाळगणार्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून :
4देवपित्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
वडिलांची निवडणूक
5मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत.
6ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.
7अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा;
8तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,
9आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करण्यास व उलट बोलणार्यांना कुंठित करण्यासही समर्थ व्हावे.
खोटे शिक्षक
10कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत; त्यांत विशेषेकरून सुंता झालेल्यांपैकी आहेत;
11त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात.
12त्या लोकांतील त्यांचाच
कोणीएक संदेष्टा म्हणतो,
“क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू,
आळशी व खादाड असतात.”
13ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,
14ह्यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे.
15शुद्ध जनांस सर्वकाही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत.
16आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.
सध्या निवडलेले:
तीत 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: