YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहे. 8

8
संदेष्ट्याला यरूशलेमेतील अमंगळ कृत्यांचा दृष्टांत
1मग बाबेलातील बंदिवासाच्या सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला. 2मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले, त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला, त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातूसारखे मला दिसले. 3मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती. 4आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते. 5मग तो मला म्हणाला “मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते,” प्रवेशव्दारातही चिडवणारी मूर्ती होती. 6तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ते काय करत आहेत हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्ये करीत आहे, मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्राएल घराणे करीत आहे, तुम्ही जाऊन पाहा ते मोठे घृणास्पद आहे.” 7मग त्याने मला मैदानाच्या प्रवेश व्दारात नेले, मग मी पाहिले तेथे भिंतीला मोठे छिद्र पडलेले मला दिसले. 8तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, भिंतीला खोदकाम कर. म्हणून मी भिंतीत खोदले तेव्हा पाहा, तेथे दरवाजा होता. 9तेव्हा तो मला म्हणाला, “जा आणि दुष्ट घृणास्पद गोष्टी होतांना आपल्या डोळ्यांनी पाहा.” 10मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरूशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या. 11तेव्हा इस्राएलाच्या घराण्याचे सत्तर वडील मी पाहिले त्यामध्ये याजन्या चा मुलगा शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येक मनुष्याजवळ धूप जाळण्याचे भांडे होते त्यांचा सुंगध वर घेतल्या जात होता. 12मग तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू पाहिलेस का इस्राएलाच्या घराण्याचे वडील अंधारात काय करतात ते? प्रत्येक मानव मूर्तीच्या गृहात लपून काय करतात, ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हास बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे. 13आणि तो मला म्हणाला, ‘पुन्हा वळून पहा, दुसरी मोठी घृणास्पद बाब ते करीत आहे.” 14पुन्हा त्याने मला परमेश्वर देवाच्या मंदिराच्या दरवाज्याच्या उत्तर भागात नेले, आणि पहा! स्त्रिया बसून तम्मुजासाठी दुःख करीत होत्या. 15तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे बघितलेस का? पुन्हा वळून पहा! यापेक्षा अधिक घृणा येणारे काम तू डोळ्यांनी पहाशील.” 16परमेश्वर देवाच्या देवळाच्या आतील प्रांगणात त्याने मला आणले, आणि पहा! परमेश्वर देवाच्या देवळाच्या प्रवेश व्दारात देवडी आणि वेदीवर पंचवीस माणसे परमेश्वर देवाच्या वेदीकडे पूर्वेला तोंड व परमेश्वर देवाच्या देवळाकडे पाठमोरे करून सुर्याची उपासना करीत होते. 17तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे. 18म्हणून मीही त्यांच्या विरुध्द कार्य करेन, त्यांच्यावर मी कृपादृष्टी करणार नाही आणि त्यांची मी दाणादाण करणार आहे, ते माझ्या कानी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”

सध्या निवडलेले:

यहे. 8: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन