YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयो. 37

37
1“खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते,
ते त्याच्या जागेवरून सरकले आहे.
2ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका,
देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका.
3देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो.
ती सर्व पृथ्वीभर चमकते.
4त्यानंतर आवाजाची गर्जना होते,
देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो.
वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
5देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे.
देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
6तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.
‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
7देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे
म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
8म्हणून पशू लपण्यास जातात,
आणि त्यांच्या गूहेत राहतात.
9दक्षिणेकडून चक्रीवादळ येते
उत्तरेकडून थंड वारे येतात.
10देवाच्या नि:श्वासाने बर्फ दिल्या जाते
आणि पाण्याच्या विस्तार धातूसारखा गोठून जातो.
11खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो
तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो.
12तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो
देव जी आज्ञा देतो ती त्यांनी सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळावी.
13काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो,
आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते
14ईयोबा, याकडे लक्ष दे,
थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का?
तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का?
देव जो ज्ञानाने परिपूर्ण त्याचे आश्चर्यकर्म तू जाणतोस काय?
17तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय,
दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते.
18तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय?
जे आकाश ओतीव आरशाप्रमाणे अढळ आहे?
19देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग.
अंधारामुळे आम्हास आमचे भाषण रचता येत नाही.
20मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय?
तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे आहे.
21आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही
वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो.
22उत्तरेकडून सोनेरी वैभव येते,
देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते.
23जो सर्वशक्तिमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही,
तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो.
तो लोकांस त्रास देत नाही.
24म्हणूनच लोक त्याचे भय धरतात.
परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस मान देत नाही.”

सध्या निवडलेले:

ईयो. 37: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन