YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहो. 22

22
यार्देनेजवळ उभारलेली वेदी
1मग यहोशवाने रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला बोलावले; 2तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हाला आज्ञा करून जे सांगितले होते ते सर्वकाही तुम्ही केले आणि जे मी तुम्हाला आज्ञापिले त्या सर्वांविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली 3मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही. परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे. 4आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या त्याने विसावा दिला आहे; तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा, आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा. 5तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.” 6यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले. 7मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या पश्चिमेला दिले होते; आणखी जेव्हा यहोशवाने त्यांना त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यांना आशीर्वाद दिला. 8तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.” 9मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्राएलाच्या इतर वंशजांतून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले. 10तेव्हा यार्देन नदीच्या पश्चिमेच्या कनानातील गलीलोथ येथे रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश पोहचल्यावर, त्यांनी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली. 11तेव्हा इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ येथे, “जेथे इस्राएलाचे लोक उतरून आले होते तेथे एक वेदी बांधली आहे.” 12असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्याविरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला. 13त्यानंतर इस्राएल लोकांनी, रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोपे पाठविले. त्यांनी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले. 14आणि त्याच्याबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि त्यांच्यातील प्रत्येकजण इस्राएलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता. 15तेव्हा गिलाद देशात रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश त्याच्याकडे येऊन त्यांनी येऊन असे सांगितले, 16परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुद्ध असे पातक का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून, परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय? 17पौराच्या प्रकरणी#पहा - गणना 25:1-9; स्तोत्र. 106:28 जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही, 18सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल. 19आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आमच्यामध्ये वतन करून घ्या, परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध आणि आमच्याविरुद्ध ही बंड करू नका. 20जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही. 21तेव्हा रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांनी इस्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकारी होते त्यांनी उत्तर देऊन म्हटले, 22जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस; 23परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही वेदी बांधली, तिच्यावर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल, तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करो. 24कदापि नाही, आम्ही अशा भीतीने विचार केला कि कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे? 25हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील. 26यास्तव आम्ही म्हटले की, “चला आपणासाठी एक वेदी बांधू, जी होमार्पणासाठी किंवा यज्ञार्पणासाठी नसेल.” 27तर ती, आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढ्यांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावी; अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पणांनी व आपल्या यज्ञार्पणांनी व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांना असे म्हणू नये की, “परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.” 28यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना असे सांगू की तुम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना “पाहा; ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञार्पणासाठी बांधली नाही तर ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.” 29आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो. 30तेव्हा रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्राएलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते, तेव्हा त्यांना बरे वाटले. 31यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास ह्याने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांना सांगितले, “आज आम्हांला कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.” 32मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशात इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यांना वर्तमान सांगितले. 33तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशात रऊबेन वंश व गाद वंश राहिले होते, तेव्हा रऊबेन व गाद यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही. 34तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद#अर्थ-साक्षीची वेदी” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल.

सध्या निवडलेले:

यहो. 22: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन