लेवी. 12
12
प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2इस्राएल लोकांस सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध रहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. 3आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
4नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तुला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये. 5परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध रहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.
6तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत.
7मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत. 8तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी मग याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती शुद्ध होईल.
सध्या निवडलेले:
लेवी. 12: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.