YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 129

129
सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना
1इस्राएलाने आता म्हणावे की,
माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
2त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला,
तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
3नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले;
त्यांनी आपली तासे लांब केली.
4परमेश्वर न्यायी आहे;
त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
5जे सियोनेचा तिरस्कार करतात,
ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
6ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच
सुकून जाते त्यासारखे होवोत.
7त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही,
किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
8त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की,
“परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो;
परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 129: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन