YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 34

34
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत.
1मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन.
माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
2मी परमेश्वराची स्तुती करणार,
विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
3तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या.
आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
4मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले.
आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
5जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील,
आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
6या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले
आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
7परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो.
आणि त्यास वाचवतो.
8परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
9जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा.
त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
10तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात,
परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
11मुलांनो माझे ऐका
आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
12सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
13तर वाईट बोलण्यापासून आवर,
आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
14वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर.
शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
15परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे,
त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
16परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे.
तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
17नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो,
आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
18जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे.
आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
19नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत,
परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
20परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल.
त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
21परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील,
जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
22परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल.
त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 34: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन