स्तोत्र. 54
54
शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र
1हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,
आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
2हे देवा, माझी प्रार्थना ऐक;
माझ्या शब्दाकडे कान दे.
3कारण माझ्याविरूद्ध परके #गर्विष्ठउठले आहेत,
आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत;
त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
4पाहा, देव माझा मदतनीस आहे;
प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
5तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील;
तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
6मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण;
हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
7कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे;
माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
सध्या निवडलेले:
स्तोत्र. 54: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.