स्तोत्र. 61
61
देवाच्या संरक्षणावर भरवसा
दाविदाचे स्तोत्र
1हे देवा, माझी आरोळी ऐक;
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन;
माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
3कारण तू माझ्यासाठी आश्रय,
माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
4मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन;
मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
5कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस;
जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
6तू राजाचे आयुष्य वाढव;
त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
7मी देवासमोर सर्वकाळ राहो;
तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
8मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन,
म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
सध्या निवडलेले:
स्तोत्र. 61: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.