YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 63

63
देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो
दाविदाचे स्तोत्र
1हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन;
शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे;
माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
2म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी
मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.
3कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
4म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;
मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
5माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल;
माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.
6मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो
आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
7कारण तू माझे सहाय्य आहे,
आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.
8माझा जीव तुला चिकटून राहतो;
तुझा उजवा हात मला आधार देतो.
9पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात
ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.
10त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल;
त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
11परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल;
जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल,
पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 63: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन