YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 81

81
देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा
आसाफाचे स्तोत्र
1देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा;
याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.
2गाणे गा आणि डफ वाजवा,
मंजुळ वीणा व सतार वाजवा.
3नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस,
आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
4कारण हा इस्राएलासाठी नियम आहे.
हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.
5जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला,
तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला.
तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.
6मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे;
टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.
7तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली;
मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले;
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.
8अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो,
हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.
9तुझ्यामध्ये परके देव नसावेत;
तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस.
10मीच तुझा देव परमेश्वर आहे,
मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.
11परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही;
इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.
12म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले,
अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.
13अहा, जर माझे लोक माझे ऐकतील;
अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल!
14मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन
आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.
15परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील.
ते सर्वकाळ अपमानीत राहतील.
16मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन;
मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 81: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन