1
वधू व यरूशलेमकन्या
1हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
2(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे#तो माझे मुखचुंबन घेवो ,
कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
3तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे,
तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
4मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ.
(तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे.
(तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
5(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे.
मी केदारच्या #हे अरबशी संबंधित इश्माएली कुळातील एक आहे (उत्पत्ती 25.13; यशया 21:16-17; स्तोत्र 120:5 पहा). हे कुळ सामान्यतः काळ्या तंबूमध्ये राहत होते, म्हणून केदाराचा संदर्भ काळ्या रंगाच्या तरुण स्त्रीशी केला आहे. तंबूसारखी काळी आणि
शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे.
6मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका.
कारण सूर्याने मी होरपळले आहे.
माझे स्वतःचे भाऊ#माझ्या आईची मुले माझ्यावर रागावले होते.
त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले.
परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.
7(ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग:
तो तू तुझा कळप कोठे चारतोस?
तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस?
तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?
8(तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी,
जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर
माझ्या कळपाच्या मागे जा.
तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
वधूवर
9माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
10तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत.
तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.
11मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले
सोन्याचे दागिने करेन.
12(ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर #मेजावरअसता
माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
13माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला,
माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
14माझा प्रियकर एन-गेदी#हा मृत समुद्राच्या नैऋत्य किनाऱ्यावरील एक हिरवळीचा प्रदेश आहे, त्याला उत्साहवर्धक आणि उपजाऊ स्थान म्हणून ओळखले जाते, कारण त्यामधून एक झरा वाहतो. मधील
द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.
15(तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
तू फारच सुंदर आहेस.
तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
16(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस.
आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत.
आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.