YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ प्रस्तावना

प्रस्तावना
पौलाने स्वतः करिंथ येथे स्थापन केलेल्या ख्रिस्तमंडळीमध्ये श्रद्धा आणि ख्रिस्ती जीवन ह्यांना अनुलक्षून ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या सोडवण्यासाठी पौलाने हे बोधपत्र लिहिले आहे. त्या वेळी करिंथ हे आंतरदेशीय स्वरूपाचे महानगर होते व रोमन अधिकाराखालील अखेया प्रांताची ती राजधानी होती. व्यापाराची वर्दळ, अभिमानास्पद संस्कृती, धर्मांची विविधता व सर्वत्र बोकाळलेली अनैतिकता ही ह्या ग्रीक शहराची काही वैशिष्ट्ये होती.
चर्चमधील फुटीर वृत्ती, अनैतिकता, उपासनेतील सुव्यवस्था, लैंगिक व वैवाहिक प्रश्न, सदसद्विवेकबुद्धीशी निगडित प्रश्न, पवित्र आत्म्याची कृपादाने व पुनरुत्थान ह्या विषयांवर पौलाने अत्यंत मर्मभेदी स्वरूपात शुभवर्तमानाचा प्रकाशझोत टाकला आहे.
तेराव्या अध्यायात प्रीती हे देवाने त्याच्या प्रजेला दिलेले सर्वोत्कृष्ट वरदान आहे, हे सांगताना पौलाची प्रतिभा बहरलेली दिसते. संपूर्ण बोधपत्रामधील बहुधा सर्वांत अधिक ज्ञात असलेला हा उतारा आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-1:9
ख्रिस्तमंडळीतील फुटीर वृत्ती 1:10-4:21
लैंगिक अनैतिकता व कौटुंबिक जीवन 5:1-7:40
ख्रिस्ती व ख्रिस्तीतर लोकांचे संबंध 8:1-11:1
उपासनेतील सुव्यवस्था 11:2-14:40
ख्रिस्ताचे व ख्रिस्ती श्रद्धावंतांचे पुनरुत्थान 15:1-15:58
यरुशलेममधील ख्रिस्ती लोकांसाठी निधी 16:1-16:4
शुभेच्छा आणि समारोप 16:5-16:24

सध्या निवडलेले:

1 करिंथ प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन