YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य प्रस्तावना

प्रस्तावना
तीमथ्य हा आशिया मायनरमध्ये राहणारा एक ख्रिस्ती तरुण होता. त्याची आई यहुदी होती व वडील ग्रीक होते. प्रेषित पौलाचा सोबती व साहाय्यक म्हणून त्याने पौलाच्या प्रेषितकार्यामध्ये सहभाग घेतला. पौलाचे तीमथ्यला पहिले बोधपत्र तीन मुख्य विषय हाताळते. पहिल्या प्रथम ख्रिस्ती लोकांमध्ये पसरत असलेल्या चुकीच्या धर्मशिक्षणाविरुद्ध ह्या बोधपत्रात इशारा दिलेला आहे. हे चुकीचे धर्मशिक्षण यहुदी आणि यहुदीतर लोकांच्या कल्पनांचे मिश्रण होते व त्या शिकवणुकीनुसार असे शिकविले जात होते की, हे जग दुष्ट आहे व तारणप्राप्तीसाठी माणसाने विशिष्ट गुप्त ज्ञान मिळवावयास हवे; ठराविक प्रकारच्या अन्नाच्या बाबतीत निर्बंध पाळावयास हवेत व लग्न करू नये. ह्या बोधपत्राच्या पुढील भागात ख्रिस्तमंडळीचे व्यवस्थापन व उपासना ह्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच ख्रिस्तमंडळीमधील नेतृत्त्व कसे असावे व प्रसेवकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत, ह्यांचे विवेचन केलेले आहे. प्रस्तुत बोधपत्राच्या शेवटच्या भागात तीमथ्यने व्यक्तिशः येशू ख्रिस्ताचा उत्तम सेवक म्हणून कसे जीवन जगावे व श्रद्धावंत लोकांमधील निरनिराळ्या वयोगटांतील लोकांबरोबर कसे संबंध ठेवावयास हवेत, ह्याविषयी बोध केलेला आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
ख्रिस्तमंडळीतील नेतृत्त्व कसे असावे 1:3-3:13
व्यक्तिशः तीमथ्यला केलेले मार्गदर्शन 4:1-6:21

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन