YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथ 6

6
1आम्ही देवाबरोबर कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही केलेला त्याच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ जाऊ देऊ नका. 2कारण तो म्हणतो: ‘योग्य समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले. पाहा, उचित समय आत्ताच आहे. पाहा, आता तारणाचा दिवस आहे!’
3आम्ही करत असलेल्या सेवाकार्यात काही दोष दिसून येऊ नयेत म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत नाही. 4उलट, सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, यातना, विपत्ती, पेचप्रसंग, 5मार खाण्यात, तुरुंगवासात, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टात, निद्राहीनतेत, उपासमारीत 6तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, धीराने, चांगुलपणात, पवित्र वृत्तीने, खऱ्या प्रीतीने, 7सत्यसंभाषणाने, देवाच्या सामर्थ्याने आणि ह्रा व संरक्षण करणाऱ्या नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी, 8मान, अपमान व अपकीर्तीने, आम्ही आमची पात्रता पटवून देतो. आम्हाला फसविणारे म्हणून गणण्यात येते तरी आम्ही खरे आहोत. 9अज्ञात असलो तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असलो तरी पाहा, आम्ही जिवंत आहोत. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी ठार मारलेले नाही. 10दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे, गरीब असलो तरी पुष्कळांना सधन करणारे. कफल्‍लक असलो, तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आमची पात्रता पटवून देतो.
मनाचे औदार्य दाखवावे म्हणून विनंती
11अहो, करिंथकरांनो, तुमच्याबरोबर आम्ही अगदी प्रांजळपणे बोलत आहोत. आमचे अंतःकरण एकदम खुले आहे. 12आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे. 13तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी तुमची अंतःकरणे आमच्या अंतःकरणासारखी एकदम खुली करा.
देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये
14तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची सहभागिता कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? 15ख्रिस्ताची एकवाक्यता सैतानाशी कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? 16देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत! स्वतः देवाने असे म्हटले आहे,
मी त्यांच्यामध्ये निवास करून राहीन
व त्यांच्यात फिरेन,
मी त्यांचा देव होईन
व ते माझे लोक होतील.
17म्हणून,
त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,
असे प्रभू म्हणतो
आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका,
म्हणजे मी तुमचे स्वागत करीन.
18मी तुमचा पिता होईन
आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या व्हाल,
असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.

सध्या निवडलेले:

2 करिंथ 6: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन