YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 थेस्सल प्रस्तावना

प्रस्तावना
थेस्सलनीका येथील ख्रिस्तमंडळीमध्ये येशूच्या द्वितीय आगमनाविषयी अजूनही गोंधळ होता. हा गोंधळ दूर करण्याकरिता पौलाचे थेस्सलनीकाकरांना दुसरे बोधपत्र लिहिले असून हे प्रभूच्या द्वितीय आगमनाचा दिवस येऊन गेलेला आहे, ह्या चुकीच्या समजुतीचा समाचार घेते. पौल त्याच्या वाचकांना असे दाखवून देतो की, ख्रिस्त पुन्हा येण्यापूर्वी वाइटाचा व दुष्टपणाचा एका दुष्टाच्या रहस्यमय नेतृत्त्वाखाली कहर माजेल. हा ख्रिस्तविरोधक असेल.
प्रेषित पौल त्याच्या वाचकांना त्रास व दुःख ह्यांच्याशी सामना करीत असतानाही त्यांच्या श्रद्धेमध्ये स्थिर राहण्याचे आवाहन करतो व त्यांनी स्वतः पौलाचे व त्याच्या सहकाऱ्यांचे उदाहरण पाहून जे चांगले आहे, त्याच्यात टिकून राहावे व पोटापाण्याचा उद्योग करीत राहावे, असा उपदेश करतो.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
स्तुती आणि शिफारस 1:3-12
ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाविषयी बोध 2:1-17
ख्रिस्ती जीवनाविषयी उपदेश 3:1-15
समारोप 3:16-18

सध्या निवडलेले:

2 थेस्सल प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन