YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 25:22-27

प्रेषितांचे कार्य 25:22-27 MACLBSI

अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे.” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल.” दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्तने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. फेस्त म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा व उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना! ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुदी लोकांच्या सर्व समुदायाने यरुशलेम व येथेही मला अर्ज केला. परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, असे मला कळून आले आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरवले. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही म्हणून तुमच्यापुढे व विशेषकरून हे राजा अग्रिप्पा, आपणापुढे ह्याला आणले आहे. अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे; कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही.”