याकोब 1
1
शुभेच्छा
1बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा.
विश्वास आणि सुज्ञता
2माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना; 3कारण तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो. 4धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न पडता तुम्ही प्रगल्भ व पूर्ण व्हावे. 5परंतु जर तुमच्यापैकी कोणी सुज्ञतेत उणा असेल, तर त्याने ती देवाजवळ मागावी म्हणजे ती त्याला मिळेल कारण तो सर्वांना आनंदाने व उदारपणाने देतो. 6मात्र मागणाऱ्याने काही शंका न धरता विश्वासाने मागावे कारण शंका धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंचबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. 7-8असा माणूस द्विधा मनःस्थितीचा असून आपल्या सर्व मार्गांत चंचल असतो. आपणाला प्रभूकडून काही मिळेल, असे त्याने समजू नये.
गरिबी आणि श्रीमंती
9प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा 10आणि प्रभूने आपल्याला दीन अवस्थेकडे आणले ह्याचा आनंद धनवानाने मानावा कारण धनवान गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. 11सूर्य प्रखर तेजाने उगवला व त्याने गवत कोमेजविले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगात मस्त असताना कोमेजून जाईल.
कसोटी
12जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल. 13कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात पाडले’, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाइटाचा मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. 14परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो. 15मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप पूर्ण वाढल्यावर मरणास उपजविते.
16माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. 17दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते. 18आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला.
खरे धर्माचरण
19माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा. 20कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही. 21म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे तुमच्या अंतःकरणात असलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.
22वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात स्वतःलापाहणाऱ्या माणसासारखा आहे. 24तो स्वतःला आरशात पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो, हे लगेच विसरून जातो. 25परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून त्यांचे पालन करण्यात टिकून राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात देवाचा आशीर्वाद मिळतो.
26आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. 27देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत कैवार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, हे आहे.
सध्या निवडलेले:
याकोब 1: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: