YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब प्रस्तावना

प्रस्तावना
संपूर्ण जगात विखुरलेल्या देवाच्या जनतेला उद्देशून लिहिलेले याकोबचे बोधपत्र हा व्यावहारिक मार्गदर्शनाचा नमुना आहे. ख्रिस्ती विचारसरणी व वर्तणूक यांना पोषक ठरेल असे प्रबोधन प्रभावीपणे करण्यासाठी लेखकाने अनेक उपमा-उदाहरणांचा परिणामकारक वापर केलेला आहे. श्रीमंती आणि गरिबी, मोह, सभ्य वर्तणूक, पूर्वग्रह, श्रद्धा आणि कृती, जिभेचा वापर, सुज्ञता, तंटे-बखेडे, अहंकार आणि विनम्रता, दुसऱ्यांचा न्याय, फुशारकी, सहनशीलता आणि प्रार्थना अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांना ह्या बोधपत्रात स्थान मिळाले आहे.
ख्रिस्ती श्रद्धा कृतीमध्ये व्यक्त व्हावयास हवी, हा विचार प्रस्तुत बोधपत्रात अधोरेखित करण्यात आला आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1
श्रद्धा व सुज्ञता 1:2-8
श्रीमंती आणि गरिबी 1:9-11
मोह आणि परीक्षा 1:12-18
वचन ऐकणे - वचन पाळणे 1:19-27
भेदभावाविरुद्ध इशारा 2:1-13
श्रद्धा आणि कृती 2:14-26
जिभेचा वापर 3:1-18
ख्रिस्ती मनुष्य आणि जग 4:1-5:6
विविध प्रकारचे धर्मशिक्षण 5:7-20

सध्या निवडलेले:

याकोब प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन