YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 11:22-25

मार्क 11:22-25 MACLBSI

येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्‍वास ठेवा. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा’, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे अवश्य घडेल, असा विश्‍वास धरील, त्याच्याकरता ते केले जाईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता, ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्‍वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल. आणखी, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्यांना क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करील.