तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात. सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो. विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासी लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील. त्यांना सदासर्वकाळ अधिकार असो. आमेन.
1 पेत्र 5 वाचा
ऐका 1 पेत्र 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 5:7-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ