YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 2

2
उपासनेबाबत सूचना
1तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी. 2अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे. 3असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो. 4कारण सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे ज्ञान समजावे अशी त्यांची इच्छा आहे: 5कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे. 6त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय. 7आणि या उद्देशाने त्यांनी मला या साक्षीसाठी घोषणा करणारा आणि प्रेषित म्हणून नियुक्त केले—मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही—आणि गैरयहूदीयांचा विश्वासू आणि खरा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
8म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. 9स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे, 10तर जे परमेश्वराची भक्ती करणार्‍यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.
11स्त्रियांनी#2:11 किंवा पत्नींनी शांतपणे व नम्रतेने शिकावे. 12स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे. 13कारण आदाम प्रथम घडविला गेला आणि नंतर हव्वा. 14आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली. 15म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल.

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन