YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथकरांस 2

2
1मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही. 2कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल? 3मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल. 4तुम्हाला दुःखी करावे म्हणून नव्हे तर माझ्या प्रीतीची खोली तुम्हाला कळावी, म्हणून हे पत्र मी तुम्हाला क्लेश आणि हृदयाच्या यातना आणि अनेक आसवे गाळून लिहिले आहे.
पातक्यांना क्षमा
5जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही. 6तुम्ही सार्‍यांनी बहुमताने त्याला शिक्षा दिली ती पुरेशी आहे. 7याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे. 8आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या. 9हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे. 10तुम्ही एखाद्याला क्षमा करता, त्याला मीही क्षमा करतो. ज्याची मी क्षमा केली आहे आणि जर क्षमा करण्याचे बाकी आहे तर ती ख्रिस्ताच्या समक्ष तुमच्या हितासाठी केली आहे. 11यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये; कारण त्याचे डाव आपल्याला कळत नाहीत असे नाही.
नव्या कराराचे सेवक
12मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले. 13परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.
14परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात. 15ज्यांचे तारण होत आहे व ज्यांचा नाश होत आहे त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वरासाठी ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत 16एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्‍याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे? 17आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.

सध्या निवडलेले:

2 करिंथकरांस 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन