YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमोस 7

7
टोळधाड, अग्नी व ओळंबा
1सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते. 2जेव्हा त्यांनी जमीन साफ केली, तेव्हा मी मोठ्याने ओरडलो, “सार्वभौम याहवेह, क्षमा करा! याकोब कसा टिकू शकेल? तो फार लहान आहे!”
3तेव्हा याहवेहचे मन द्रवले,
“पुन्हा हे घडणार नाही,” याहवेह असे म्हणाले.
4सार्वभौम याहवेहने हे मला दाखविले: सार्वभौम याहवेहने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले; त्यांनी खोल समुद्र कोरडा केला आहे आणि त्यांनी भूमी गिळंकृत केली आहे. 5तेव्हा मी म्हणालो, “अहो सार्वभौम याहवेह, मी तुम्हाला विनंती करतो, थांबा! याकोब कसा वाचेल? तो फार लहान आहे!”
6मग याहवेहचे मन द्रवले.
आणि सार्वभौम याहवेह म्हणाले, “हे देखील घडणार नाही.”
7त्यांनी मला हे दाखविले: ओळंबा लावून बांधलेल्या एका भिंतीच्या जवळ, प्रभू हातात ओळंबा घेऊन उभे होते. 8आणि याहवेहने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?”
मी म्हणालो, “ओळंबा!”
नंतर प्रभू म्हणाले, “पाहा मी माझे लोक इस्राएल यांच्यामध्ये ओळंबा धरणार आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही.
9“इसहाकाचे उच्च पूजास्थाने नाश करण्यात येतील
आणि इस्राएलची पवित्रस्थाने पाडण्यात येतील;
मी माझ्या तलवारीने यरोबोअमाच्या विरुद्ध उठेन.”
आमोस आणि अमस्याह
10तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत. 11कारण आमोस असे म्हणत आहे:
“ ‘यरोबोअम हा तलवारीने मरणार आहे,
आणि इस्राएल खात्रीने,
आपल्या भूमीवरून दूर बंदिवासात जाईल.’ ”
12नंतर अमस्याह आमोसला म्हणाला, “हे संदेष्ट्या, येथून यहूदीया प्रांतात परत जा आणि तिथे जाऊन आपली भाकर कमव आणि तुझे संदेश तिथे सांगत राहा! 13याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.”
14आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो. 15परंतु मी गुरांची राखण करीत असताना याहवेहने मला दूर नेले आणि मला म्हणाले, ‘जा, आणि माझ्या इस्राएली लोकांना संदेश सांग.’ 16म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात,
“ ‘इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस,
आणि इसहाकाच्या घराण्याविरुद्ध प्रचार करणे थांबव.’
17“म्हणून याहवेह असे म्हणतात:
“ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल,
तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील,
तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल,
आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील.
इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या
देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ”

सध्या निवडलेले:

आमोस 7: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन