YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 1

1
कोरेश बंदिवानांना परतण्यास मदत करतो
1यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.
2“पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की:
“ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. 3तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहेत त्यांनी वर यहूदीयातील यरुशलेमास जाऊन याहवेह इस्राएलचे परमेश्वर, परमेश्वर जे यरुशलेमात आहेत त्यांचे मंदिर बांधावे आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत. 4आणि उरलेले जे यहूदी लोक जिथे कुठे असतील त्यांनी यरुशलेमला जाणार्‍या यहूदी लोकांना सोने, चांदी, अन्य वस्तू आणि पशू, तसेच यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरासाठी स्वैच्छिक अर्पणेही पुरवावी.’ ”
5नंतर परमेश्वराने यहूदाह व बिन्यामीन वंशांचे पुढारी आणि लेवी व याजक यांच्या मनामध्ये याहवेहचे मंदिर पुन्हा बांधण्यासाठी यरुशलेमला ताबडतोब जाण्याची उत्कट इच्छा निर्माण केली. 6सर्व शेजाऱ्यांनी दिलेल्या स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांबरोबरच सोने, चांदी, गुरे याशिवाय इतर मोलवान भेटवस्तूही देऊन त्यांची मदत केली.
7त्या शिवाय बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने यरुशलेम येथील याहवेहच्या मंदिरातून नेलेल्या ज्या वस्तू आपल्या दैवतांच्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या कोरेश राजाने बाहेर काढल्या. 8कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या.
9यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश होता:
सोन्याच्या पराती 30,
चांदीच्या पराती 1,000,
चांदीची पात्रे 29,
10सोन्याचे कटोरे 30,
चांदीचे कटोरे 410,
इतर पात्रे 1,000.
11अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या.
या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या.

सध्या निवडलेले:

एज्रा 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन