YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 17

17
मीखाहने केलेली मूर्तिपूजा
1एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाह नावाचा एक मनुष्य होता, 2तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी#17:2 अंदाजे 13 कि.ग्रॅ. कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.”
तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!”
3जेव्हा त्याने ती अकराशे चांदीची नाणी त्याच्या आईला परत दिली, ती म्हणाली, “माझ्या मुलाने चांदीने मढविलेली प्रतिमा बनवण्यासाठी मी माझी चांदी याहवेहला समर्पित करते. मी ते तुला परत देईन.”
4जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल#17:4 अंदाजे 2.3 कि.ग्रॅ. चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे. आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली.
5आता ही व्यक्ती मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून प्रतिष्ठापना केली. 6त्या दिवसांमध्ये इस्राएलला कोणी राजा नव्हता; प्रत्येकजण त्याला योग्य वाटेल ते करत असे.
7एक तरुण लेवी जो यहूदाह कुळातील यहूदीयातील बेथलेहेम नगरात राहत होता, 8यहूदीयातील बेथलेहेम नगर सोडून राहण्यासाठी तो चांगलेसे ठिकाण शोधीत होता. प्रवास करत तो डोंगराळ भागात एफ्राईम देशातील मीखाहच्या घराजवळ आला.
9मीखाहने त्याला विचारले, “तू कुठून आलास?”
तो म्हणाला, “मी यहूदीयातील बेथलेहेम येथील एक लेवी आहे आणि मी राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहे.”
10त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल#17:10 अंदाजे 115 ग्रॅ. चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.” 11तो लेवी त्याच्यासोबत राहण्यास तयार झाला आणि त्याच्या पुत्रांपैकी एक असा तो राहू लागला. 12तेव्हा मीखाहने लेवीला शुद्ध केले आणि तो तरुण त्याचा पुरोहित झाला आणि त्याच्या घरात राहू लागला. 13आणि मीखाहने म्हटले, “मला माहीत आहे की याहवेह माझे कल्याण करतील, कारण हा लेवी माझा पुरोहित झाला आहे.”

सध्या निवडलेले:

शास्ते 17: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन