YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 15

15
एलीफाज
1मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:
2“सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का
किंवा पूर्वेकडील गरम वार्‍याने आपले पोट भरणार काय?
3कुचकामी शब्दांनी,
आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय?
4परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस
आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो.
5तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात;
धूर्तांची जीभ तू अंगीकारतो.
6माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते;
तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते.
7“सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का?
पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का?
8परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय?
शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का?
9आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे?
आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे?
10केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत;
जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत.
11परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द
तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?
12तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे,
तुझे डोळे असे का चमकतात,
13यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा
आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे?
14“मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत,
किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत?
15जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही,
त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही,
16तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो,
तो किती कमी दर्जाचा असावा!
17“माझे लक्षपूर्वक ऐक, मी तुला स्पष्ट करून सांगतो;
मी जे पाहिले आहे ते तुला सांगू दे,
18ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले,
त्यातील काहीच गुपित न ठेवता ते जाहीर केले,
19(ज्यांना केवळ ही भूमी देण्यात आली होती
आणि त्यांच्यामध्ये कोणीही विदेशी नव्हता):
20दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर,
तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.
21त्याचे कान भयाच्या शब्दाने भरतात;
सर्वकाही चांगले असताना विध्वंसक त्याच्यावर हल्ला करतो.
22अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही;
तलवारीसाठी त्याला नेमले आहे.
23गिधाडा सारखा तो आपल्या अन्नासाठी भटकतो;
अंधकाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला माहीत आहे.
24संकट व चिंता त्याला घाबरे करतात;
हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,
25कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो
आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,
26त्यांच्या विरोधात अपमानाने
जाड आणि मजबूत ढाल घेऊन तो दोष लावतो.
27“कारण या दुष्ट माणसाच्या अंगावर चरबी चढलेली आहे;
त्याच्या कंबरेवर मांस चढले आहे,
28पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल,
कोणी राहत नाही अशा ठिकाणी,
तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल.
29त्याची श्रीमंती आणि त्याची संपत्ती टिकणार नाही,
ना पृथ्वीवर त्याची मालमत्ता वाढणार.
30त्याला अंधकारातून सुटका नाही;
अग्नीने त्याचा अंकुर जळून जाईल,
परमेश्वराचा मुखश्वास त्याला दूर वाहून नेईल.
31निरर्थक धनावर विसंबून राहून त्याने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये,
कारण त्याला त्याचा काही लाभ मिळणार नाही.
32त्याच्या ठरलेल्या वेळे आधी तो गळून जाईल,
आणि त्याच्या फांद्या भरभराट पावणार नाहीत.
33न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा,
बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.
34कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील,
आणि लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी जाळून टाकील.
35ते क्लेशाची गर्भधारणा करतात आणि दुष्टतेला जन्म देतात;
आणि त्यांचे गर्भाशय कपट प्रसवते.”

सध्या निवडलेले:

इय्योब 15: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन