एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले. ते जात असताना येशू होडीत झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले. तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले. नंतर येशूंनी शिष्यांना विचारले, “तुमचा विश्वास कुठे आहे?” भीती आणि विस्मयाने ते एकमेकांना म्हणू लागले, “हे कोण आहेत? ते वारा आणि लाटांनाही आज्ञा करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”
लूक 8 वाचा
ऐका लूक 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 8:22-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ