मार्क 14
14
येशूंना बेथानीत तैलाभ्यंग
1वल्हांडण#14:1 वल्हांडण इजिप्त देशातल्या 430 वर्षांच्या गुलामगिरीच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतर साजरा केलेला सण, सात दिवसानंतर खमीर न घालता भाकरी खाण्याचा सण. हे दोन्ही सण एकत्रित पाळीत असत व त्यांची नावेही समानार्थाने वापरलेली आहेत. आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. 2“पण” ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
3येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली.
4तेथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “या तेलाची व्यर्थ नासाडी कशाला? 5एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही#14:5 ग्रीक अधिक याहून 300 दिनारी अधिक किमतीस ते विकता आले असते आणि आलेले पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला.
6“तिला असू द्या,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 7गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील.#14:7 अनु 15:11 तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. 8तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर अगोदरच सुगंधी तेल ओतले आहे. 9मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जेथे कोठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तेथे तिने केलेल्या या सत्कार्याची आठवण करण्यात येईल.”
10नंतर यहूदा इस्कर्योत, बारा शिष्यांपैकी एक, येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास प्रमुख याजकाकडे निघून गेला. 11तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
शेवटचे भोजन
12बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रितीप्रमाणे वल्हांडणाच्या कोकर्याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी अशी आपली इच्छा आहे?”
13तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले की, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. त्याच्यामागे जा. 14तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ 15तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तेथेच आपल्यासाठी तयारी करा.”
16ते शिष्य नगरात गेले, आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे सर्वकाही असल्याचे त्यांना आढळून आले. मग त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
17संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तेथे आले, 18ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.”
19ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?”
20“तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. 21कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
22भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.”
23त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले.
24मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे, व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे 25मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
26मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.
पेत्राच्या नाकारण्यासंबंधी येशूंचे भविष्यकथन
27“तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे की:
“मी मेंढपाळावर प्रहार करीन आणि
मेंढरांची पांगापांग होईल.#14:27 जख 13:7
28परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटेन.”
29पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी जाणार नाही.”
30“पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज—होय, आजच रात्री दोन#14:30 काही मूळप्रतींमध्ये हा शब्द आढळत नाही दोन वेळा वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील.”
31परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले.
गेथशेमाने
32आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशूंनी शिष्यांना बसण्यास सांगितले व म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” 33त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकुळ होऊ लागले. 34ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकुळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.”
35थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी. 36“अब्बा!#14:36 अब्बा अरेमिक भाषेमध्ये पिता पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.”
37नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तुला जागे राहता आले नाही का? 38तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”
39येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली. 40नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेलेच आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे, हे समजले नाही.
41मग ते तिसर्या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. 42उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
येशूंना अटक
43ते बोलत आहे तेव्हाच, यहूदा, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक, प्रमुख याजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या, तरवारी आणि सोटे धारण करणार्या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला.
44आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” 45तत्क्षणी यहूदा येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. 46नंतर लोकांनी येशूंना धरले आणि अटक केले. 47पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून प्रमुख याजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
48येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तलवार आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? 49मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला अटक केली नाही. परंतु धर्मशास्त्रात लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण झाली पाहिजे.” 50मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले.
51मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, 52परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला.
न्यायसभेपुढे येशू
53येशूंना महायाजक कयफा याच्याकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले होते. 54पेत्र काही अंतरावरुन, त्यांच्यामागे चालत आला आणि महायाजकाच्या अंगणात आला आणि पहारेकर्यांमध्ये जाऊन काय होते ते पाहत बसला.
55मुख्य याजक, किंबहुना, सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही. 56नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता.
57नंतर काहींनी उठून त्याच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली: 58आम्ही त्याला बोलताना ऐकले, “मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करीन.” 59तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता.
60हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे? 61पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही.
नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, “तू धन्यवादित परमेश्वराचा पुत्र मसीहा आहेस का?”
62“मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”
63महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे? 64तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे आता तुम्हाला काय वाटते?”
तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला. 65त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.
पेत्र येशूंना नाकारतो
66हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तेथे प्रमुख याजकाची एक दासी आली. 67तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले.
“तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.”
68पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला.#14:68 काही मूळप्रतींमध्ये तेव्हा कोंबडा आरवणे
69त्याला तेथे उभे असलेल्या एका दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा माणूस त्यांच्यापैकी एक आहे!” 70पेत्राने ते पुन्हा नाकारले.
थोड्या वेळाने जी माणसे तेथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!”
71हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहा, त्या माणसाला मी ओळखत सुद्धा नाही.”
72तेवढ्यात कोंबडा दुसर्या वेळेला#14:72 काही मूळप्रतींमध्ये हा शब्द आढळत नाही दुसर्या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.
सध्या निवडलेले:
मार्क 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.