7
1तट बांधल्यावर मी वेशींना दारे लावली. द्वारपाल, संगीतकार व लेवी यांची नेमणूकही केली; 2मी यरुशलेमच्या शासनाची जबाबदारी माझा भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्याह यांना दिली. हनन्याह अत्यंत विश्वासू असून सर्व लोकांपेक्षा तो परमेश्वराचे भय अधिक बाळगत असे. 3मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.”
बंदिवासातून परतणार्यांची यादी
4शहर मोठे व विस्तृत होते, पण लोकसंख्या थोडी होती आणि जी घरे होती, त्यांची पुनर्बांधणी झाली नव्हती. 5नंतर माझ्या परमेश्वराने शहराच्या सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना एकत्र करून वंशावळ्यांप्रमाणे त्यांची नोंदणी करावी असे विचार माझ्या मनात घातले. जे सर्वप्रथम परतले त्यांच्या वंशावळ्याची नावनिशी मला सापडली. तिच्यात असे लिहिले होते:
6बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले. 7जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह):
यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली लोकांची नावे ही:
8पारोशचे वंशज 2,172,
9शफाट्याहचे 372,
10आरहचे 652,
11पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,818,
12एलामचे 1,254,
13जत्तूचे 845,
14जक्काईचे 760,
15बिन्नुईचे 648,
16बेबाईचे 628,
17अजगादचे 2,322,
18अदोनिकामचे 667,
19बिग्वईचे 2,067,
20आदीनचे 655,
21हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98,
22हाशूमचे 328,
23बेसाईचे 324,
24हारीफचे 112,
25गिबोनचे 95,
26या ठिकाणातून पुरुष:
बेथलेहेम व नटोफाहचे 188,
27अनाथोथचे 128,
28बेथ-अजमावेथचे 42,
29किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743,
30रामाह व गेबाचे 621,
31मिकमाशचे 122,
32बेथेल व आयचे 123,
33दुसऱ्या नबोचे 52,
34दुसऱ्या एलामचे 1,254,
35हारीमचे 320,
36यरीहोचे 345,
37लोद, हादीद व ओनोचे 721,
38सनाहाचे 3,930.
39याजक:
यांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,
40इम्मेरचे 1,052,
41पशहूरचे 1,247,
42हारीमचे 1,017.
43लेवी: यांचे वंशज:
येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74.
44संगीतकार:
आसाफचे वंशज 148.
45मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज:
शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे,
अक्कूबचे, हतीताचे,
शोबाईचे, एकूण 138.
46मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज:
झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,
47केरोसचे, सीयाचे, पादोनचे,
48लबानाहचे, हगाबाहचे, शलमाईचे,
49हानानचे, गिद्देलचे, गहरचे,
50रेआयाहचे, रसीनचे, नकोदाचे,
51गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे,
52बेसाईचे, मऊनीमचे, नफूसीमचे,
53बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,
54बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,
55बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,
56नसीयाहचे व हतीफाचे.
57शलोमोनच्या सेवकांचे वंशज: पोकेरेथ-हस्सबाईम व आमोन.
यांचे वंशज:
सोताईचे, सोफेरेथचे, पेरीदाचे,
58यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,
59शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे, आमोनचे,
60मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.
61याच वेळी पर्शियाचा तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत:
62ते यांचे वंशज होते:
दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 642.
63आणि याजक पितृकुळातील:
यांचे वंशज:
हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते).
64यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले. 65यास्तव राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणातील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.
66सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते. 67याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 245 गायक व गायिका होत्या. 68त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 गाढव, 69435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती.
70त्यांच्यातील काही पुढार्यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक#7:70 अंदाजे 8.4 कि.ग्रॅ. सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले. 71काही कुलप्रमुखांनी कामासाठी भांडारात 20,000 दारिक#7:71 अंदाजे 170 कि.ग्रॅ. सोने, 2,200 मीना#7:71 अंदाजे 1.2 मेट्रिक टन चांदी दिली. 72बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना#7:72 अंदाजे 1.1 मेट्रिक टन चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले.
73इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.
एज्रा नियम वाचतो
सातव्या महिन्यापर्यंत ते यरुशलेमला आपआपल्या नगरात स्थायिक झाले.