YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 110

110
स्तोत्र 110
दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले:
“मी तुझ्या शत्रूंना
तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत,
तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”
2याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील,
“तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!”
3तुझी सेना युद्ध समयी
स्वेच्छेने तुला साथ देईल.
प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे
पवित्रतेने सुशोभित होऊन
तुझे तरुण तुझ्याकडे येतील.
4याहवेहने जी शपथ घेतली आहे
आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत:
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे
तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”
5तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे;
आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील.
6ते राष्ट्रांवर आपला यथार्थ निकाल घोषित करतील,
मृतदेहांचा ढीग लागेल आणि ते संपूर्ण पृथ्वीच्या शासकांना चिरडून टाकतील.
7तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील,
आणि आपले मस्तक उंचावतील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 110: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन