YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 13

13
स्तोत्र 13
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का?
किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?
2मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे?
कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे?
कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?
3याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या.
या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.
4माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,”
आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.
5कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे;
माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.
6मी याहवेहची स्तुती गाईन,
कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन