YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 138

138
स्तोत्र 138
दावीदाचे स्तोत्र.
1हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन;
मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन.
2उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन,
आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल,
तुमची उपकारस्तुती करेन,
कारण तुम्ही तुमच्या वचनाला
तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.
3जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले;
मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.
4हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील,
कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.
5ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील,
कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.
6याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात;
गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.
7मी संकटांनी वेढलेला असलो,
तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता;
माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता;
तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.
8याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील;
परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे—
आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 138: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन