स्तोत्रसंहिता 14
14
स्तोत्र 14
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
1मूर्ख#14:1 किंवा अनैतिक आपल्या मनात म्हणतो,
“परमेश्वर नाही.”
ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत,
सत्कर्म करणारा कोणी नाही.
2मानवांमध्ये कोणी समंजस आहे का?
परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का?
हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून
खाली पाहतात.
3प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;
सत्कर्म करणारा कोणीच नाही,
एकही नाही.
4दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय?
भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील.
ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.
5पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत,
कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत.
6दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता,
परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.
7अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!
जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील,
तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.