YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 19

19
स्तोत्र 19
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
1आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते;
अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते.
2दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात;
प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.
3या प्रकियेत बोलणे नाही, शब्दही नाही,
त्यात आवाजही नाही;
4तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते,
कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे.
परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे.
5आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे,
जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो.
6तो आकाशाच्या एका टोकास उगवतो
दुसर्‍या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो;
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
7याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत;
ते आत्म्याला ताजेतवाने करतात.
याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत,
ते भोळ्यांना सुज्ञ करतात.
8याहवेहचे नियम योग्य आहेत,
ते हृदयास आनंद देतात,
याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत,
त्या नेत्रांना प्रकाश देतात.
9याहवेहचे भय निर्मळ आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहेत.
याहवेहचे निर्णय स्थिर आहेत,
आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत.
10सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत,
अतिशुद्ध सोन्यापेक्षाही;
ते मधापेक्षा मधुर आहेत,
पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.
11कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात;
त्याचे पालन करणार्‍यास मोठे प्रतिफळ मिळते.
12स्वतःच्या चुका कोणाला समजणार?
माझ्या गुप्त दोषांबद्धल मला क्षमा करून निर्दोष ठरवा.
13तसेच जाणूनबुजून पाप करण्यापासून आपल्या सेवकास थांबवा;
ते मला त्याच्या अधीन करू नये.
तेव्हाच मी दोषमुक्त होईन,
एखाद्या मोठ्या गुन्ह्याबाबत निर्दोष ठरेन.
14याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार,
माझ्या मुखातून निघालेले शब्द
आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 19: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन