YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 23

23
स्तोत्र 23
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
2ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात,
ते मला संथपणे वाहणार्‍या झर्‍याजवळ नेतात.
3ते माझा जीव ताजातवाना करतात.
ते आपल्या नावासाठी
मला नीतिमार्गाने चालवितात.
4मृत्युछायेच्या दरीतूनही#23:4 किंवा अंधार्‍या दरीतून
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
5तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत
माझ्यापुढे ताट वाढता;
तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता;
माझा प्याला भरभरून वाहत आहे.
6खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती
मजबरोबर आयुष्यभर असतील,
आणि मी याहवेहच्या,
घरात सदासर्वदा राहीन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन