YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 26

26
स्तोत्र 26
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा,
मी दोषरहित जीवन जगलो;
याहवेह, मी न डगमगता
तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
2याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा,
माझे मन आणि हृदयाची पारख करा.
3कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो
आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.
4कपटी लोकांसोबत मी बसत नाही
किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.
5दुष्कर्म करणार्‍यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात
आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.
6मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन
आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,
7म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन
आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.
8याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते,
इथेच तुमचे वैभव वसती करते.
9पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला,
आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.
10त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत,
त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.
11मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन;
मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.
12माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत;
महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 26: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन