YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 46

46
स्तोत्र 46
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत.
1परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;
संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
2पृथ्वी उलथीपालथी झाली
आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,
3सागरांच्या जलांनी गर्जना केल्या,
आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला#46:3 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
4आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते;
तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.
5परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील;
प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.
6राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली;
त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते.
7सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;
याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला
8या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा;
त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
9दिगंतापर्यंत युद्धे
ते बंद करतात.
ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात;
ते रथांना#46:9 किंवा ढालींना अग्नीत भस्म करतात.
10ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा;
राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल.
पृथ्वीवर माझी महिमा होईल.”
11सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;
याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 46: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन