1 पेत्र 3:10-11
1 पेत्र 3:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
1 पेत्र 3:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण, जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावेत, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व खोटारडेपणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.
1 पेत्र 3:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे. त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.
1 पेत्र 3:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण,“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत; त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.