१ शमुवेल 19:1-2
१ शमुवेल 19:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती. योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.
१ शमुवेल 19:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा.
१ शमुवेल 19:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते. म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा.