१ शमुवेल 19:9-10
१ शमुवेल 19:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता. तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला.
१ शमुवेल 19:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला, शौलाने दावीदाला आपल्या भाल्याने भिंतीशी खिळण्याचा प्रयत्न केला, परंतु दावीद तिथून निसटला आणि भाला भिंतीत शिरला. त्या रात्री दावीद निसटला.
१ शमुवेल 19:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरात बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवत असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला. दाविदाला भाल्याने भोसकून त्याला भिंतीशी खिळावे असा शौलाने प्रयत्न केला, पण तो शौलापुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला; तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला.