१ शमुवेल 23:16-17
१ शमुवेल 23:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला. तो त्यास म्हणाला, “भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.”
१ शमुवेल 23:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले. तो म्हणाला, “भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे.”
१ शमुवेल 23:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंचवट्यावरील झाडीत गेला व देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली. त्याने त्याला म्हटले, “भिऊ नकोस, माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल ह्यालाही हे ठाऊक आहे.”