१ शमुवेल 28:5-6 - Compare All Versions
१ शमुवेल 28:5-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले. शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 28 IRVMAR१ शमुवेल 28:5-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले. शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 28 MRCV१ शमुवेल 28:5-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौलाने परमेश्वराला प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 28 MARVBSI