YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 31:4-5 - Compare All Versions

१ शमुवेल 31:4-5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तू आपली तलवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तलवार घेऊन तिच्यावर पडला. शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही त्याच्याप्रमाणेच आपल्या तलवारीवर पडून मेला.

सामायिक करा
१ शमुवेल 31 IRVMAR

१ शमुवेल 31:4-5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला. जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि त्याच्याबरोबर मरण पावला.

सामायिक करा
१ शमुवेल 31 MRCV

१ शमुवेल 31:4-5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला. शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.

सामायिक करा
१ शमुवेल 31 MARVBSI